विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट

विश्वास – गतिमंद मुलांसाठी कार्यशाळा

जानेवारी १९९० पासून विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे सेवाभावी कार्य सातत्याने सुरू आहे. केंद्रातील विद्यार्थ्यांचा आज कालपेक्षा आणि उद्या आजपेक्षा चांगला व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

केंद्राचा पत्ता

ट्रॉपिकल प्राईमा, छत्रपती संभाजी महाराज मार्ग

विष्णु नगर, नौपाडा, ठाणे (प.)

सौजन्य: ठाणे महानगरपालिका, ठाणे

वेळ

सोमवार ते शनिवार

सकाळी 10.30 ते 4.30

आमच्याबद्दल

संस्थापिका: कै. सौ. अश्विनी सुळे, श्रीमती ज्योत्स्ना दिलीप प्रधान

विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विश्वास–गतिमंद मुलांसाठी कार्यशाळामध्ये १८ वर्षांवरील गतिमंद मुलांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना कार्यक्षम करण्यासाठी व्यवसायपूर्व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित व अनुभवी शिक्षिका नेमून त्यांच्या कार्यक्षमतेनुसार अनेक लोकोपयोगी उत्पादने तयार केली जातात.

या उत्पादनांनी विश्वासची वेगळी ओळख देश-विदेशात निर्माण केली आहे. मुलांना समाजात सहजतेने वावरता येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.

चित्रकला, नृत्य-नाट्यकला यांचेही प्रशिक्षण दिले जाते. कलेच्या क्षेत्रातील साचेबंद अनुकरणाऐवजी स्वनिर्मितीचा आविष्कार साधण्याचा प्रयत्न केला जातो. विविध संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांमध्ये मुलांनी वैयक्तिक व सांघिक पारितोषिके पटकावली आहेत.

या प्रवासात पालक परिवार, सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे हितचिंतक आणि मित्र परिवार यांचे सहकार्य विश्वासच्या कार्याला सातत्याने लाभते.

विश्वस्त

विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक.

  • श्रीमती ज्योत्स्ना दिलीप प्रधान
  • श्री. अमोघ अरविंद सुळे
  • श्री. संजय वासुदेव भोईर
  • सौ. कविता प्रकाश देशमुख
  • श्री. एन. जी. क्षीरसागर
  • अडव्होकेट श्री. संजय श्रीराम बोरकर

उपक्रम / कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आणि आनंददायी उपक्रम.

  • नियमितपणे योगासने.
  • नित्योपयोगी तसेच सणसमारंभानुसार आकर्षक वस्तूंची निर्मिती.
  • सहभोजन, सामूहिक प्रार्थना.
  • पारंपरिक सणांच्या उपक्रमात सहभागी.
  • वार्षिक निवासी सहल.
  • वार्षिक स्नेहसंमेलन.
  • चित्रकला व नृत्य-नाट्यकलेचे प्रशिक्षण.

समाजातील जागरूक नागरिक, डॉक्टर्स, इतर व्यावसायिक तसेच एनजीओज यांच्या वस्तूखरेदी-विक्रीतून विश्वासच्या कार्याला हातभार लागतो.

देणगी

आपला पाठिंबा आमच्या उपक्रमांना अधिक बळ देतो.

बँक तपशील

Unique Registration No.
AAATV0745RF2021501
PAN No.
AAATV 0745 R
Account No.
509 0101 0000 6736
Account Name
Vishwas Charitable Trust
IFS Code
UTIB0000509
Bank & Branch
Axis Bank Ltd. / Utalsar, Thane (MH), Thane 400601

महत्त्वाची माहिती

विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने देण्यात येणाऱ्या देणगीस 80G अंतर्गत आयकरात सवलत उपलब्ध आहे.

मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी कार्यशाळा बांधण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. नेरळ (कर्जत) येथे भूखंड खरेदी केला असून 50 ते 100 मुलांना समाविष्ट करणारी प्रास्ताविक योजना तयार आहे.

संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

पत्रव्यवहारासाठी पत्ता

300 'स्मृति' बाजीप्रभू देशपांडे रोड

विष्णूनगर, नौपाडा, ठाणे (प.) 400302

संपर्क क्रमांक

श्रीमती ज्योत्स्ना दिलीप प्रधान – 9769979552

श्री. संजय भोईर – 9223451069

मुख्याध्यापिका सौ. मीना क्षीरसागर – 9969924967